Womens World Cup 2022
Womens World Cup 2022 Sakal
क्रीडा

हीच ती वेळ! भारतीय महिला संघ इंग्लंडचा वचपा काढणार?

सकाळ डिजिटल टीम

Womens World Cup 2022, England Women vs India Women: महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर वेस्ट इंडीजला शह देत दमदार कमबॅक केले. सलामीच्या लढतीत भारतीय महिला संघाने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. 3 पैकी 2 सामन्यातील विजय मिळवल्यानंतर आता मिताली ब्रिगेडसमोर इंग्लंडच्या महिला संघाचे आव्हान असेल. बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार माउंट माउंगानुईच्या बे ओवल मैदानात (Bay Oval, Mount Maunganui) सकाळी साडे सहा वाजता महिला संघ इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे.

मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने (India Women) 6 मार्चला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात केली. या सामन्यात भारतीय संघाने 107 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाने दमदार कमबॅक केले. वेस्ट इंडीज विरुद्ध त्यांनी 155 धावांनी विजय नोंदवला.

या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी शतकी खेळी साकारली. या दोघींची कामगिरी भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावणारी अशीच आहे. आता याच आत्मविश्वासासह महिला संघ इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ स्पर्धेतील अव्वल चारमधील आपले स्थान भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

दुसऱ्या बाजूला गत विजेत्या इंग्लंड संघ यंदाच्या स्पर्धेत संघर्ष करताना दिसते. इंग्लंड महिला संघाने स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यांना एकाही सामन्यात विजय नोंदवता आलेला नाही. 2017 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात फायनल झाली होती. या सामन्यात भारतीय संघाला 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंडच्या संघाला स्पर्धेतील पुढचा प्रवास कठिणच आहे. त्यांना आणखी एक घाव देऊन मागील पराभवाचा वचपा काढण्यासह यंदाच्या स्पर्धेतील आपली दावेदारी भक्कम करण्याची टीम इंडियाला संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Message: ध्यान संपलं... एक्झिट पोल जाहीर; PM मोदींचा देशाला उद्देशून संदेश

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

SCROLL FOR NEXT