10 fabulous Catches in ICC Women's World Cup 2022 esakal
क्रीडा

CWC 22: महिला वर्ल्डकपमधील 10 भन्नाट कॅच फक्त एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

आयसीसी महिला वर्ल्डकप (ICC Women's World Cup 2022) स्पर्धा न्यूझीलंड मध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेतील साखळी सामने आता संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सेमी फायनलमध्ये कोण जाणार यासाठी सध्या गुणतालिकेत रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान आयसीसीने (ICC) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून यंदाच्या वर्ल्डकपमधील जबरदस्त 10 कॅचेसचे व्हिडिओ (10 fabulous Catches Video) शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये जवळपास सर्वच संघाच्या खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या महिला वर्ल्डकप 2022 मधील 10 जबरदस्त कॅचेसमध्ये काही स्पीप कॅचेस, काही डाईव्ह मारलेले तर काही बाऊंडरी लाईनवर घेतलेल्या कॅचेसचा समावेश आहे. हे कॅचेस बघून आपल्याला महिला क्रिकेटचा (Women's Cricket) जागतिक स्तर आता कोणत्या उंचीवर पोहचला आहे याची कल्पना येऊ शकते.

महिला वर्ल्डकपची साखळी फेरी आता संपण्याच्या मार्गावर आहे. सध्या गुणतालिकेत सहा पैकी सहा सामने जिंकून 12 गुण मिळवून ऑस्ट्रेलिया (Australia) अव्वल स्थानावर आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेने 5 पैकी 4 विजय मिळवून 8 गुणांसह दुसऱ्या तर भारत 6 पैकी 3 सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडीजने (West Indies) देखील 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत मात्र रनरेटच्या आधारावर भारत (India) तिसऱ्या तर विंडीज चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे आतापर्यंत 5 सामने झाले आहेत त्यातील त्यांनी 2 सामने जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT