ICC Womens World Cup 2022 Points Table
ICC Womens World Cup 2022 Points Table Sakal
क्रीडा

CWC Points Table : तीन स्थानासाठी 'चार-चौघीत' तगडी फाईट

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 Points Table : न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी (Australia Women) विजयी मालिका कायम राखत दक्षिण आफ्रिकेला (South Africa Women) पराभूत केले. दुसरीकडे भारतीय महिला (India Women) संघाने बांगलादेशला (West Indies Women)नमवत सेमी फायनलमधील आशा पल्लवित ठेवल्या. या दोन सामन्यानंतर महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत थोडा बदल झाला आहे. जो बदल झालाय त्यात भारतीय संघ फायद्यात दिसतोय.

बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी पोहचलाय. आपले हे स्थान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पुढचा आणि साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावा लागेल.

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने सेमी फायनल पक्की केलीये. उर्वरित तीन स्थानासाठी चार संघात चुरस निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी वेस्ट इंडीज आणि भारताविरुद्धचा सामना गमावला तर ते 8 गुणांवरच राहतील. या परिस्थितीत भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या खात्यातही प्रत्येकी 8-8 गुण जमा होतील.

स्पर्धेत सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडला सूर गवसला आहे. त्यांनी पराभवाच्या हॅटट्रिकनंतर दमदार कमबॅक करत सलग दोन विजय नोंदवत आपल्या खात्यात 4 गुण जमा केले आहेत. उर्वरित दोन सामन्यात त्यांच्यासमोर पाकिस्तान आणि बांगलादेशचे आव्हान असेल. जर त्यांनी हे दोन्ही सामने जिंकले तर 8 गुण मिळवून सेमीच्या शर्यतीत इंग्लंडही कायम राहिल. याचा अर्थ भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिके विरुद्धचा सामनाही जिंकावाच लागेल. जर या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर पुन्हा जर तरच्या समीकरणात अडकण्याची वेळ मिताली ब्रिगेडवर येऊ शकते. दक्षिण आफ्रिकेनं भारतासोबतच वेस्ट इंडीजलाही पराभूत केले तर इंग्लंडने दोन्ही सामने जिंकल्यावरही भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहून सेमीसाठी पात्र ठरु शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT