ICC Womens World Cup 2022 Points Table  
क्रीडा

CWC 2022 Points Table : भारतीय महिला दुसऱ्या स्थानावर; पाक-इंग्लंड भोपळा

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 Points Table : न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून पराभवाचा सामनाही करावा लागला. मात्र वेस्ट इंडीज संघाला पराभूत करत त्यांनी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने तीन पैकी तीन सामने जिंकले असून 6 गुणासह ऑस्ट्रेलियन महिला पहिल्या स्थानावर आहेत. भारतीय महिला संघाने 3 पैकी दोन विजय आणि एका पराभवासह 4 गुण कमावले आहेत. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांनीही स्पर्धेत दोन सामने जिंकले आहेत. ते 4 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तान महिला संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. भारतीय महिला संघाने आपल्या सुरुवातीच्या तीन पैकी दोन लढती जिंकून 4 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. गोलंदाजी गटात राजश्वरी गायकवाड ही न्यूझीलंडच्या ला ताहुहु Lea Tahuhu हिला तगडी फाइट देताना दिसते. पहिल्या पाचमध्ये भारतीय अष्टपैलू स्नेह राणाचाही समावेश आहे.

आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात राजेश्वरी गायकवाडनं 180 चेंडूत 101 धावा खर्च करुन 7 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर आहे. ली ताहुहु ही अव्वलस्थानी असली तरी तिने राजेश्वरीपेक्षा एक मॅच जास्त खेळली आहे. लीनं 4 सामन्यात 180 चेंडूत 146 धावा खर्च करुन 9 विकेट्स घेतल्या आहेत. भारताची अष्टपैलू स्नेह राणा हिने 3 सामन्यात 141 चेंडूत 81 धावा खर्च करुन पाच विकेट्स घेतल्या आहेत. ती या यादीत पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची आयाबोनगा खाका आणि वेस्ट इंडीजची अनिसा मोहम्मद प्रत्येकी 6-6 विकेट्स घेऊन तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

बॅटरमध्ये वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज हिने 3 सामन्यात 207 धावांसह अव्वलस्थान पटकावले आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या स्मृती मानधना आणि हरमनप्रित कौर या दोघी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. हरमनप्रितनं 3 सामन्यात 185 तर स्मृतीनं 3 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. दोघींच्या खात्यात एक अर्धशतक आणि एका शतकाची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Tamil Nadu Politics : दिल्लीची पुनरावृत्ती की नवी खेळी? 'थलपती'च्या TVK ला पाठिंबा देताना काँग्रेस पुन्हा तीच मोठी चूक करतेय? पक्षासाठी ठरणार धोक्याची घंटा?

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Jammu Kashmir Prepaid SIM Rules : जम्मू-काश्मीरमध्ये आपलं प्रीपेड सिमकार्ड का चालत नाही? 99% लोकांना माहिती नाही, 'हे' आहे कारण

IPL 2026 फायनल अहमदाबादला! बंगळुरूने मान गमावला, play off चं वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT