ICC Womens World Cup 2025 India Likely To Host Event After One Decade esakal
क्रीडा

Women's World Cup : BCCI 2025 चा वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी लावणार जोर

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारत 2025 चा वनडे वर्ल्डकप आयोजित करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय यासाठी प्रयत्न करणार आहे. जर बीसीसीआय (BCCI) 2025 चा महिला वनडे वर्ल्डकप (ICCC Womens World Cup 2025) भारतात आणण्यास यशस्वी झाले तर जवळपास एक दशकानंतर भारतात महिला वनडे वर्ल्डकप होण्याची शक्यता आहे. भारताने गेला महिला वनडे वर्ल्डकप 2013 ला आयोजित केला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते. त्यांनी फायनलमध्ये वेस्ट इंडीजला 114 धावांनी पराभूत केले.

आयसीसीची वार्षिक बैठर बर्मिंगहम येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पुढच्या फ्युचर टूर प्लॅनिंगमध्ये चार महिला आयसीसी इव्हेंट आयोजित करण्याबाबत चर्चा होईल. भारत 2025 चा वनडे महिला वर्ल्डकप आयोजित करण्याच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआला नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, 'आयसीसीच्या चार महिला क्रिकेट इव्हेंटसाठी दावेदारी सादर करण्यात येणार आहे. त्यात 2024 आणि 2026 आयसीसी टी 20 वर्ल्डकप तर 2025 मध्ये वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे.'

आयसीसीची शेवटची मोठी स्पर्धा भारताने 2016 ला आयोजित केली होती. भारताने महिला टी 20 वर्ल्डकप आयोजित केला होता. त्यावेळी आयसीसी पुरूष आणि महिलांचे इव्हेंट एकाचवेळी आयोजित करत होता. आता ही पद्धत बदलण्यात आली आहे. आता महिला क्रिकेटला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे आयसीसीने दोन्ही इव्हेंट वेगवेगळे केले आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धा ही पुरूषांच्या वनडे वर्ल्डकप (1975) आधी दोन वर्षे म्हणजे 1973 पासून सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Magician Shamsundar: इंस्टाग्रामचा लाडका जादूगार शामसुंदर काका ‘अदृश्य’… ८४व्या वर्षी मागे ठेवून गेले हसू अन् जादूच्या आठवणी

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन गैरव्यवहार; सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू निलंबित, चौकशीसाठी समिती नेमली

Stomach Health: समोसा किंवा पाणीपुरी नाही तर 'हे' पदार्थ खाल्ल्याने वाढते गॅस आणि अपचन, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Latest Marathi News Live Update : जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

Kolhapur Video Tawade Hotel : २८ वर्षांपासून कोल्हापूरकरांच्या मनावर राज्य करणारी तावडे हॉटेलजवळील स्वागत कमान पाडली; भावूक करणारा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT