india vs pakistan esakal
क्रीडा

World Cup 2023 Schedule: पाकिस्तानला मोठा धक्का! जाणून घ्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकातील 5 महत्त्वाचे मुद्दे

Kiran Mahanavar

ICC World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 46 दिवस चालणार असून एकूण 48 सामने 10 ठिकाणी खेळल्या जाणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाबाबत पाच महत्त्वाचे मुद्दे.

  • एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे.

  • आयसीसीच्या वेळापत्रकाचा पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने आपल्या दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. तिला चेन्नईत अफगाणिस्तान आणि बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियात खेळायचे नव्हते. इतकंच नाही तर पीसीबीही अहमदाबादमध्ये भारताचा सामना करायला तयार नव्हता, पण आयसीसीनं ते ऐकलं नाही.

  • आयसीसी विश्वचषक 2023 गतवेळेप्रमाणे राउंड रॉबिन स्वरूपात खेळला जाईल. सर्व 10 संघ राऊंड रॉबिन फॉर्मेट अंतर्गत एकूण 9 लीग सामने खेळतील. अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

  • एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईत आणि दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.

  • विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे हे बाद फेरीचे सामने नियोजित दिवशी होऊ शकले नाहीत, तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाईल. सर्व बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील, जे दुपारी 2 पासून सुरू होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT