World Cup 2023 
क्रीडा

World Cup 2023 : एकही सामना न खेळता आफ्रिका वर्ल्ड कपसाठी पात्र! लंकेसह 2 वेळची चॅम्पियन इंडिज बाहेर

या वर्षी भारतात होणाऱ्या ICC ODI World Cup साठी आणखी एक संघ झाला पात्र...

Kiran Mahanavar

ICC ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप यंदा भारतात खेळल्या जाणार आहे. आयसीसीने विश्वचषकाच्या पात्रतेसाठी काही नवीन नियमांचा समावेश केला होता. चार वर्षे चाललेल्या या आयसीसी विश्वचषकाच्या सुपर लीगद्वारे 8 संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.

पण दरम्यान, यापैकी एक संघ असा आहे की तो एकही सामना न खेळता विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ बुधवारी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

आयसीसी विश्वचषकाच्या सुपर लीगद्वारे एकूण 8 संघांनी विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आठव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 21 सामन्यांपैकी केवळ 9 सामने जिंकले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या थेट पात्रता शर्यतीतून त्यांना बाहेर फेकला जाण्याचा धोका होता. पण तो एकही सामना न खेळता पात्र ठरला आहे.

खरं तर आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. आयर्लंड संघाने बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला असता तर ते विश्वचषकासाठी पात्र ठरले असते. मात्र मालिकेतील पहिला सामना रद्द झाला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकही सामना न खेळता विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले.

भारताशिवाय यंदाच्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. या 8 संघांनी आता आपली जागा निश्चित केली आहे.

पण यापैकी दोन संघ असे आहेत त्यांनी एका वेळी विश्वचषक जिंकला आहे. तरी पण ते पात्र ठरू शकले नाहीत. ते संघ आहेत श्रीलंका आणि वेस्ट इंडिजबद्दल. या दोन्ही संघांना पुढील विश्वचषक खेळण्यासाठी क्वालिफायर खेळावे लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT