esakal

क्रीडा

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

ICC Announces Major Change in World Cup Format : दुबई येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Mayur Ratnaparkhe

International Cricket Council announces the expansion of World Cup teams : भारतीय महिला संघाने २०२५चा विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढवली आहे. ही ऐतिहासिक घोषणा आज(शुक्रवारी) आयसीसीकडून करण्यात आली.

 आयसीसीच्या मते २०२९ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात आता आठ ऐवजी दहा संघ असणार आहेत. महिला क्रिकेटचा जागतिक विकास आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी दुबई येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

 २०२५च्या महिला विश्वचषकात आठ संघांनी भाग घेतला होता. यामध्ये नवी मुंबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच आयसीसी विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.

 आतापर्यंत, महिला एकदिवसीय विश्वचषकात फक्त आठ संघांना सहभागी होण्याची परवानगी होती, परंतु वाढती कामगिरी पातळी, प्रेक्षकांची आवड आणि महिला क्रिकेटची वेगाने वाढती व्याप्ती पाहता, आयसीसीने स्पर्धेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. हा बदल पहिल्यांदा २०२९ च्या विश्वचषकात लागू केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Latest Marathi News Live Update : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर! पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ताजे भाव एका क्लिकमध्ये

China Pakistan partnership: चीनच्या मदतीने पाकिस्तानची अवकाशात झेप; भारतावर लक्ष ठेवण्यासाठी १६ महिन्यांत सहा उपग्रह प्रक्षेपित?, अवकाशातून राहणार नजर

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा वाढली! १५ जुलैला १२ स्थानके सुरू होणार, पण पूर्ण मेट्रोसाठी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार

SCROLL FOR NEXT