ICC World Cup 2023 
क्रीडा

ICC World Cup 2023: वर्ल्ड कप शेड्यूलमुळं BCCI मध्ये फूट? पंजाबपासून मध्यप्रदेशपर्यंत नाराजीचा सूर

Kiran Mahanavar

ICC World Cup 2023 : आयसीसी आणि यजमान बीसीसीआयने मिळून यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले आहे. हा विश्वचषक भारतातील 10 शहरांमध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणार आहे. या घोषणेनंतर बीसीसीआयचे काही लोक त्याच्यावर नाराज झाले आहेत.

विश्वचषक सामन्यांचे यजमानपद न मिळालेल्या राज्य संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे सामने अहमदाबाद, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता येथे खेळल्या जाणार आहेत.

सोमवारी आलेल्या बातम्यांमध्ये तिरुअनंतपुरमच्या नावासह 12 शहरांची नावे होती, मात्र आयसीसीने केवळ 10 शहरांच्या नावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये भारतातील अनेक मोठी मैदाने यजमानपदापासून वंचित राहिली, त्यात मोहाली, इंदूर, रांची, नागपूर या शहरांचा समावेश आहे.

या घोषणेनंतर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, 1987 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे आयोजन इंदूरने केले होते. बीसीसीआयच्या मजबुरीची मला माहिती नाही. इंदूरला क्रिकेटचा चांगला इतिहास आहे, त्यामुळे यजमानपदाची अपेक्षा होती, असे तो म्हणाला.

इंदूर हे शहर आहे जे सतत एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी सामने आयोजित केले जाते. नुकताच या स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला गेला.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने सांगितले की, फक्त मेट्रो आणि ज्या शहरांमधून अधिकारी येतात त्यांना होस्टिंग मिळाले आहे. पंजाबला सराव सामन्याचेही यजमानपद मिळाले नाही, त्यामुळे तो खूप निराश असल्याचे त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT