ICC World Test Championship 2023 final 7-11 June at The Oval confirmed sakal
क्रीडा

ICC WTC Final: फायनलची तारीख ठरली! 'या' दिवशी रंगणार कसोटीचा महाकुंभ

Kiran Mahanavar

ICC World Test Championship 2023 Final : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

WTC फायनल इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. 12 जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. या मैदानावर 100 हून अधिक कसोटी सामने खेळले गेले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत 24 कसोटी मालिकेतील 61 कसोटी सामन्यांनंतर कसोटी चॅम्पियनशिप गदासाठी हा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

न्यूझीलंडने 2021 मध्ये साउथेम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कसोटी गदा जिंकली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया आणि भारत आघाडीवर आहेत. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर असून त्यानंतर भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते.

याशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम शर्यतीत कायम आहे. दोन्ही संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, तर श्रीलंका दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून टाकला नवा बॉम्ब ! २२ वेळा मतदान, कोण आहे ती? सीमा, स्विटी, सरस्वती...;

Women's World Cup : कर्णधाराने ज्युनियर खेळाडूला कानाखाली खेचली... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूसोबत गैरवर्तवणुक, बोर्डाने दिली प्रतिक्रिया

Katraj Tunnel : कात्रज बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला; प्रशासनाच्या निर्णयावर नागरिक संतप्त

Nashik News : नाशिक विकासकामांना 'ब्रेक'; पालकमंत्र्यांअभावी १० महिने थांबलेली कामे आता आचारसंहितेच्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

SCROLL FOR NEXT