Southampton rain twitter
क्रीडा

WTC Final : पहिल्या सेशनमध्ये पावसाची बॅटिंग

आयसीसीने जो राखीव दिवस ठेवलाय त्यात सूर्यप्रकाशाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पास दिवस खऱ्या अर्थाने पावसाच्या कसोटीचे असणार आहेत

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : साउदम्टनच्या मैदानात पावसाने बॅटिंग सुरु केल्यामुळे टॉस झालेला नाही. पहिला सेशन पाऊसच गाजवणार असल्याचे दिसते. स्थानिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाच दिवस ढगाळ वातावरण आणि पावसांच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आयसीसीने जो राखीव दिवस ठेवलाय त्यात सूर्यप्रकाशाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पास दिवस खऱ्या अर्थाने पावसाच्या कसोटीचे असणार आहेत. (ICC World Test Championship Final 2021 India vs New Zealand toss has been delayed Due To Rain Southampton) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान पहिली वहिली टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळवली जात आहे.

या स्पर्धेचे जेतेपद कोण पटकवणार याची चर्चा रंगत असताना दोघात तिसरा चॅम्पियन होण्याच विसरा! हा पेच पावसाने निर्माण केलाय. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वेळेत सुरु झालेला नाही. ताईट फाइट होईल पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पाणी फेरण्याची दाट शक्यता दिसते. पुढच्या 24 तासात पावसाची ये जा सुरु राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. 18 जूनला साउदम्प्टनमध्ये 12 ते 16 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. दिवसभर हवा थंड राहील. पाचही दिवस कसोटी अशाच वातावरणात होईल. त्यामुळे पावसाची टांगती तलवार सामन्यावर कायम राहणार आहे.

कसोटीतील वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा निकाल हा एका कसोटीपेक्षा बेस्ट 'ऑफ थ्री' अशा पद्धतीने व्हावा, अशी ईच्छा भारतीय संघाचे कोच रवि शास्त्रींसह अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी व्यक्त केली होती. पावसामुळे सामन्यावर संकटाचे ढग दाडल्यानंतर अनेकांना आता हा विचार पटला असेल. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात आयसीसीने केवळ एक दिवसच अतिरिक्त दिलाय. स्थानिक हवामान खात्यानुसार तो एकच दिवस पावसाशिवाय असेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे कसोटीचा निकाल लागण्याची शक्यता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या वहिली आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन्ही संघांना संयुक्तपणे देण्यात येईल, असे आयसीसीने अगोदरच स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT