rohit sharma
rohit sharma AFP
क्रीडा

WTC हिटमॅनला खुणावतोय सिक्सर किंगचा रेकॉर्ड

सुशांत जाधव

भारत (Indian Cricket Team) आणि न्यूझीलंड (New Zealand Cricket Team) यांच्यात 18 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (ICC World Test Championship) फायनल रंगणार आहे. पहिल्या वहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपवर कोण नाव कोरणार याची चर्चा आता रंगण्यास सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीमला कडवे आव्हान देण्याची क्षमता केन विल्यमसनच्या (Ken Williamson) टीममध्ये आहे. त्यामुळे फायनलचा मुकाबला रंगतदार होणार यात शंका नाही. दोन्ही संघ यासाठी कसून तयारी करत आहे.

ट्रॉफीसोबतच भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम खुणावत आहे. रोहित शर्मा याचा प्रमुख दावेदार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम (Sixer Record) सध्याच्या घडीला इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नावे आहे. त्याने या स्पर्धेत 31 षटकार खेचले आहेत.

इंग्लंडचा संघ स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. भारत दौऱ्यातील मालिका जिंकून त्यांना आपल्या देशात रंगणाऱ्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. मात्र भारतीय संघासमोर इंग्लिश ताफ्याने गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. स्टोक्सने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील 17 सामन्यातील 32 डावात 31 षटकार खेचले आहेत. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ फायनल खेळत नसल्यामुळे बेन स्टोक्सचे रेकॉर्ड मोडून सिक्सर किंग बनण्याची संधी रोहितसमोर असेल. रोहित शर्माने 11 सामन्यातील 17 डावात 28 षटकार खेचले आहेत.

या यादीत भारतीय संघासोबत असणारा मयांक अग्रवाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 12 सामन्यातील 20 डावात 18 षटकार खेचले आहेत. त्याला टॉपला जाण्यासाठी खूपच आक्रमक खेळ दाखवावा लागले. या यादीतील चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतच्या नाव येते. पंतने 11 कसोटी सामन्यातील 18 डावात 16 षटकार खेटले आहेत. जोस बटलर 18 सामन्यातील 31 डावात 14 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT