FIFA World Cup 2022 Final Argentina
FIFA World Cup 2022 Final Argentina esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला तर काय होईल; मेस्सी किती रेकॉर्ड्स मोडेल?

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Final Argentina : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा वर्ल्डकपची फायनल होत आहे. दोन्ही संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी आपला सगळा जोर लावतील. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्यामुळे अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू आपल्या लाडक्या लिओचा वर्ल्डकप जिंकून सेंड ऑफ करण्याच्या तयारीत असतील. जर अर्जेंटिना जिंकली तर अर्जेंटिनाबरोबरच मेस्सी देखील अनेक माईलस्टोर पार करेल.

1 - अर्जेंटिना 1986 नंतर म्हणजे तब्बल 36 वर्षांनी फुटबॉल वर्ल्डकप जिंकणार.

2 - लिओनेल मेस्सी आपला पहिला विर्ल्डकप जिंकणार.

3 - तीन फिफा वर्ल्डकप जिंकणारी अर्जेंटिना हा चौथा संघ ठरेल.

4 - अर्जेंटिना युरोपची 20 वर्षाची मक्तेदारी मोडून काढेल. 2002 मध्ये ब्राझील जिंकली होती. त्यानंतर फिफा वर्ल्डकप जिंकणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला संघ ठरले.

5 - अर्जेंटिना जिंकली तर वर्ल्डकप फायनलमध्ये जय - पराजयाचे इक्वेशन 3 - 3 असे बरोबरीत येईल. त्यांनी 1978 आणि 1986 ला वर्ल्डकप जिंकला होता.

6 - लिओनेल मेस्सी आपली वर्ल्डकप कारकिर्द ट्रॉफीने संपवले.

7 - अर्जेंटिना 2002 नंतर युरोपियन संघाला अंतिम फेरीत पराभूत करणारी पहिला दक्षिण अमेरिकन संघ ठरले.

8 - मेस्सीने फायनलमध्ये गोल केला आणि इतर कोणालाही गोल करता आला नाही तर तो गोल्डन बूटचा मानकरी ठरले.

9 - मेस्सीने जर यंदाही स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला तर तो 2014 आणि 2022 अशा दोनवेळा हा मान पटकावणारा पहिला खेळाडू ठरले.

10 - मेस्सीने जर फायनल सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला तर तो एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 5 वेळा सामनावीर होणारा पहिला खेळाडू ठरले.

11 - जर मेस्सीने फायनलमध्ये गोल केला तर त्याचे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 6 गोल होतील. ही त्याची एका वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी ठरले. त्याने 2014 मध्ये 5 गोल केले होते.

12 - मेस्सीने जर फायनलमध्ये एक गोल केला तर तो पेलेंच्या वर्ल्डकपमधली 12 गोलच्या रेकॉर्डची बरोबरी करेल. दोन गोल केले तर फॉनटैनच्या 13 गोलची बरोबरीत आणि हॅट्ट्रिक केली तर जर्मनीच्या मुलरच्या 14 गोलची बरोबरी करेल.

14 - मेस्सी फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर जर्मनीच्या लोथार मॅथ्यूजचे सर्वाधिक वर्ल्डकप सामने खेळण्याचे रेकॉर्ड मोडेल. सध्या दोघेही 25 सामने खेळून बरोबरीत आहेत.

15 - जर मेस्सीने गोल केला किंवा असिस्ट केले तरी तो 1966 नंतर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करण्यात आणि मदत करण्यात आघाडी घेईल. सध्या तो 19 वर आहे.

16 - जर अर्जेंटिना जिंकली तर स्पेननंतर वर्ल्डकपचा पहिलाच सामना गमावून वर्ल्डकप जिंकणारी दुसरी टीम ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT