ILT20 Adani Vs Ambani esakal
क्रीडा

ILT20 : अदानी VS अंबानी, दुबईतील आज रात्री दोन गर्भश्रीमंत भिडणार

अनिरुद्ध संकपाळ

ILT20 Adani Vs Ambani : भारताचे दोन उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात गर्भश्रीमंतीच्या यादीत अव्वल राहण्यासाठी कायम रस्सीखेच सुरू असते. आता अशीच रस्सीखेच ही दुबईच्या वाळवंटात रंगणार आहे. मात्र ही रस्सीखेच प्रत्यक्ष गौतम अदानी किंवा मुकेश अंबानी यांच्यात नसून या दोघांनी खरेदी केलेल्या संघात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. अदानी आणि अंबानी यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारचा सामना पहिल्यांदा होत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर जरी अंबानी - अदानी एकमेकांना पहिल्यांदाच भिडणार असले तरी हे दोन मोठे कॉर्पोरेट हाऊसेस यापूर्वीही व्यवसायाच्या आणि व्यापाराच्या मैदानात एकमेकांना भिडत आले आहेत. आता दोन्ही बिजनेस हाऊसेसनी महिला आयपीएलमधील संघ देखील खरेदी केले आहेत.

गल्फ जायंट्स आणि एमआय अमिराती दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जेम्स विन्सच्या नेतृत्वातील गल्फ जायंट्सचा संघ सध्या गुणतालिकेत 9 गुण घेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी सहा सामन्यापैकी 4 सामने जिंकले आहेत, एक सामना गमावला असून एक सामना अनिर्णित राहिला.

एमआय अमिरातीचा संघ किरॉन पोलार्डच्या नेतृत्वात खेळत आहे. तो सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी सहा सामन्यापैकी 3 सामने जिंकले आहेत तर दोन सामने गमावले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दुबईतील हवामान खराब झाल्याने स्पर्धेवर परिणाम झाला आहे. गल्फ जायंट्सचा अबू धाबी नाईट्स रायडर्स विरूद्धचा 25 जानेवारीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

Latest Marathi News Live Update : घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT