ICC T20 World Cup 2022 Team India Plan B
ICC T20 World Cup 2022 Team India Plan B Esakal
क्रीडा

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत काय आहे भारताचा प्लॅन B?

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20 World Cup 2022 Team India Plan B : ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्डकप सुरू होत आहे. या वर्ल्डकपपूर्वीच भारताला दुखापतींचा मोठा फटका बसला. आधी रविंद्र जडेजा आणि आता जसप्रीत बुमराह देखील वर्ल्डकपला मुकला आहे. अशा परिस्थितीत भारत 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी रवाना होणार आहे. बीसीसीआयने अजूनही जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही. ज्यावेळी संघ निवडला त्यावेळी मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांना स्टँड बाय ठेवण्यात आले होते. भारताकडे 15 ऑक्टोबरपर्यंत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर करण्यासाठी वेळ आहे.

भारताकडे स्टँड बायमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे बीसीसीआय कधीही यापैकी एकाला मुख्य संघासोबत जोडू शकतो. जर बीसीसीआयने 15 ऑक्टोबरपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही तर संघात बदल करण्यासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागले.

भारताच्या वर्ल्डकप संघाला दुखापतींनी चांगलेच दमवले आहे. वर्ल्डकप तोंडावर असताना संघातील सदस्य दीपक हुड्डाच्या फिटनेसबाबत अजून कोणतीच स्पष्टता दिसत नाहिये. तो देखील पाठीच्या दुखापतीवर एनसीएमध्ये उपचार घेत आहे. भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे.

दरम्यान, भारताचा अव्वल गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने भारताला आता प्लॅन B वर काम करावं लागणार आहे. या प्लॅनअंतर्गत भारताला आपली फलंदाजी मजबूत करावी लागले. कारण आशिया कप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या डेथ ओव्हरमधील मर्यादा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत.

अशा परिस्थितीत फलंदाज गोलंदाजीतील ही कमतरता झाकण्याचा प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियात अष्टपैलू हार्दिक पांड्या हा पाचव्या गोलंदाजाची भुमिका बजावू शकतो. याचबरोबर भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि आर. अश्विन देखील फलंदाजीत आपले चांगले योगदान देऊ शकतात. त्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारून आपल्या गोलंदांना काही अतिरिक्त धावांचे कुशन देऊ शकतील. मात्र हा प्लॅन प्रत्येकवेळी योग्य ठरेल याची शाश्वती नाही. याचं ताजं उदाहरण आपण दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात पाहिले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 227 धावा ठोकल्या. कितीही भक्कम फलंदाजी घेऊन मैदानात उतरलो तरी प्रत्येकवेळी 220 धावांच्या पुढेचे टार्गेट भारतीय संघ चेस करेलच याची शाश्वती नसते. आफ्रिकेविरूद्ध भारताची टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर भारताने 178 धावांपर्यंत मजल मारली खरी परंतु भारताला विजयासाठी तब्बल 49 धावा कमी पडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT