IND vs AUS 1st ODI athiya shetty reaction on kl rahul match winning inning in against Australian
IND vs AUS 1st ODI athiya shetty reaction on kl rahul match winning inning in against Australian  Sakal
क्रीडा

IND vs AUS 1st ODI : केएल राहुलच्या विजयी खेळीने पत्नी अथिया खूश; म्हणाली, मला माहिती असलेल्या…

सकाळ डिजिटल टीम

IND vs AUS 1st ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवला. (athiya shetty reaction on kl rahul match winning inning)

दरम्यान केएल राहुल काही दिवसांपासून त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत होता. त्याच्यावर बरीच टीका देखील झाली पण यानंतर त्याने आपण कोणापेक्षा कमी नाही हे पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या फलंदाजीने दाखवून दिले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर राहुलची पत्नी अथिया शेट्टीने देखील नवरा राहुलच्या खेळीबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

अथिया काय म्हणाली?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये राहुलने 91 चेंडूंत 75 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दुसरीकडे, राहुलच्या या खेळीनंतर पत्नी अथिया शेट्टीने राहुलचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, "मला माहित असलेल्या सर्वात पटकन सावरणाऱ्या (resilient) व्यक्तीसाठी..." यासोबत तिने हृदयाची इमोजी टाकली आहे.

अथिया शेट्टी इंस्टाग्राम स्टोरी

कसोटी मालिकेत बॅट चालली नाही

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुलला संधी देण्यात आली होती. मात्र यादरम्यान तो साजेशा खेळ करू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्यांच्याकडून खराब फलंदाजी पाहायला मिळाली. त्याचवेळी भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. पण आता राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावून आपणही मागे नसल्याचे सिद्ध केले आहे.

राहुलची एकदिवसीय कारकीर्द

गेल्या काही दिवसांपासून राहुलची बॅट शांत असली तरी या फलंदाजाने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेकदा त्याने चांगली कामगिरी केली आहे. राहुलच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 52 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान राहुलच्या बॅटमधून 46.19 च्या सरासरीने 22शेहून अधिक धावा झाल्या आहेत. ज्यामध्ये 13 अर्धशतके आणि 5 शतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने शानदार फलंदाजी करताना आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. 83 धावांवर भारतीय संघाचे 5 फलंदाज बाद होत असताना केएलने संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. केएल क्रीझवरच टिकून राहिला. त्याचवेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीसमोर 35.4 षटकांत 188 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT