India vs Australia ODI Playing-11
India vs Australia ODI Playing-11  sakal
क्रीडा

IND vs AUS: कर्णधार होताच पांड्याने घेतला मोठा निर्णय! 'या' खेळाडूला Playing-11 मधून वगळले

Kiran Mahanavar

India vs Australia ODI Playing-11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. वनडे फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्या कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज फलंदाजाला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणे कठीण आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशन आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील, असे हार्दिक पांड्याने सामन्यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत धडाकेबाज फलंदाज केएल राहुलला प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागू शकते. इशान किशनही विकेटकीपिंग करू शकतो, त्यामुळे केएल राहुलला संघात स्थान मिळणे कठीण जात आहे.

केएल राहुल सध्या अतिशय खराब फॉर्मशी झुंजत आहे. टीम इंडियाने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात त्याने केवळ 20, 17 आणि 1 धावा केल्या. या खराब कामगिरीनंतर केएल राहुलला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. केएल राहुलला आता वनडे मालिकेतही बेंचवर बसण्याचा धोका आहे.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT