ind vs aus-1st-test-4-bookies-arrested sakal
क्रीडा

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गैरप्रकार! चौघांना अटक, काय आहे प्रकरण

Kiran Mahanavar

India vs Australia 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झाला आहे. दुस-या दिवसाच्या खेळादरम्यान विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधून एक मोठी बातमी समोर आली, प्रत्यक्षात सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 4 तरुणांना पोलिसांनी अटक केली, यामागचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार क्रिकेट बुकींना अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मैदानावरील प्रत्यक्ष घडामोडी आणि त्यांचे थेट प्रक्षेपण यामधील अंतर भरून काढण्यासाठी स्टेडियमच्या बाहेरील सामन्यांची माहिती इतर बुकींसोबत शेअर करत होते. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई, भंडारा आणि नागपूर येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगणा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, भारताने शुक्रवारी स्टंप संपेपर्यंत 321/7 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (120), रवींद्र जडेजा (नाबाद 66) आणि अक्षर पटेल (नाबाद 52) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियावर 144 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने पाच, तर नॅथन लायन आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी आठव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT