Ravindra Jadeja India vs Australia 1st Test 
क्रीडा

IND vs AUS: स्मिथचा थम्स अप, जडेजाने केले क्लीन अप! चकवा देत केली दांडी गुल

Kiran Mahanavar

Ravindra Jadeja India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळल्या जात आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होता. पण मैदानात आल्यानंतर त्याने खळबळ उडुन दिली. जडेजाने पुनरागमन केल्याने कांगारूच्या ताफ्यात दहशत निर्माण झाली. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या तीन बड्या खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संघाने 109 धावांवर 5 विकेट गमावल्या.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पण सुरूवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या 1 धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच उस्मान ख्वाजाही पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या सुरुवातीला दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स पडली. त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सांभाळला, पण उपाहारानंतर रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा सेट फलंदाज लॅबुशेनला आपल्या फिरकीत अडकवले. लबुशेन 8 चौकारांच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. यानंतर मॅट रॅनशॉही जडेजाचा बळी ठरला. तो खाते न उघडताच बाद झाला. हे दोन्ही खेळाडू लागोपाठ बाद झाले.

जडेजाच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथची तर भांबेरी उडत होती. मात्र असे असतानाही स्टीव्ह स्मिथचे हातवारे काही थांबत नव्हते. रविंद्र जडेजाच्या एका चेंडूने स्टीव्ह स्मिथला चांगलेच चकवले. विशेष म्हणजे स्मिथने देखील या चेंडूला चांगला प्रतिसाद देत रविंद्र जडेजाला थम्स अप दाखवले. पण तो थम्स अप काही उपाहारानंतर टिकला नाही.

जडेजाने स्टीव्ह स्मिथच्या रूपात तिसरी विकेट घेतली. स्मिथने 107 चेंडूंचा सामना केला आणि 37 धावा करून बाद झाला. त्याने 7 चौकार मारले. अशाप्रकारे वृत्त लिहिपर्यंत जडेजाने 18 षटकांत 44 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. त्याने 7 मेडन षटकेही आहेत. जडेजाने आपल्या धोकादायक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये दहशत निर्माण केली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 172 धावांवर एकूण 6 विकेट गमावल्या आहेत. त्याचवेळी टीम इंडियासाठी जडेजासह रविचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी वृत्त लिहिपर्यंत प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT