India vs Australia 1st Test Playing XI
India vs Australia 1st Test Playing XI  
क्रीडा

IND vs AUS: कॅप्टन रोहितच्या डोक्यात प्लेइंग-11 तयार! गिल की सूर्या जाणून घ्या कोणाला मिळणार संधी

सकाळ ऑनलाईन टीम

IND vs AUS Probable Playing XI : ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून नागपूर येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. मात्र अद्यापही टीम इंडियाचा अंतिम संघ जाहीर झालेला नाही. याप्रसंगी रोहित शर्मा म्हणाला, भारतीय संघात ११ जणांमध्ये कोणाला स्थान मिळणार याची चुरस मला डोकेदुखी नाही वाटत, उलट ताकद वाटत आहे.

शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्मात आहे. सूर्यकुमार यादवनेही टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दोघांपैकी कोणत्या खेळाडूला अंतिम संघात स्थान द्यायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अंतिम ११ जणांचा संघ जाणून घेण्यासाठी गुरुवार सकाळची वाट बघावी लागेल, असे रोहित यावेळी म्हणाला.

नागपूर येथील जामठा स्टेडियममध्ये चांगला सराव केल्याने संघाची तयारी मनासारखी झाल्याचे समाधान वाटत आहे. भारतात कसोटी सामने खेळताना खेळपट्टी आव्हानात्मक असते. त्याचा विचार करून आम्हा फलंदाजांना आपापली शैली जाणून धावा करण्याची युक्ती शोधावी लागणार आहे. पारंपरिक फलंदाजीबरोबर आक्रमण करून गोलंदाजांना सतत विचारमग्न करावे लागेल. गोलंदाजांबाबत बोलायचे झाले तर आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. खेळपट्टीचा विचार करता चार दर्जेदार फिरकी गोलंदाज हाती असणे मोलाचे ठरणार आहे, असे रोहितने नमूद केले.

पहिल्या डावाची धावसंख्या महत्त्वाची पॅट कमिन्स

भारतात कसोटी मालिका खेळणे ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी सर्वात मोठे आव्हान असते. आम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे होतो आणि ज्या खेळपट्ट्यांवर खेळून मोठे होतो त्यापेक्षा भारतातील खेळपट्ट्या वेगळ्या असतात. हेझलवूड स्टार्क आणि कॅमरून ग्रीन पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचा काही प्रमाणात तोटा आम्हाला सहन करावा लागणार आहे. पण मला वाटते की नॅथन लायनची गोलंदाजी मोलाची ठरणार आहे. तसेच माझ्यावरही जबाबदारी आहे. भारतातील खेळपट्टीचा विचार करता मला वाटते की, पहिल्या डावातील धावसंख्या महत्त्वाची ठरणार आहे.

पहिल्या डावात चांगली फलंदाजी करून आघाडी घेता आली तर त्याचे पाठबळ निर्णायक ठरायची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या सर्व फलंदाजांना भारतात कसोटी सामना खेळायचा अनुभव नसला तरी त्यांच्या खेळात मोठा दर्जा, कौशल्य दडलेले आहे. मला वाटते भारतीय संघाचे आव्हान पेलायला ऑस्ट्रेलियन संघ तयार झालेला आहे. असा विश्वास कमिन्स याने यावेळी व्यक्त केला. दोन्ही देशांतील खेळाडूंनी आपआपली मते व्यक्त केली. आता उद्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल, तेव्हा कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नागपूरशी मजेदार नाते

नागपूर आणि माझे काहीतरी वेगळेच नाते आहे. इथे माझा जन्म झाला. इथेच माझे कसोटी पदार्पण हुकले होते अन् आता इथेच मी भारतीय संघाचा कप्तान म्हणून महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. आम्हा खेळाडूंनाही नागपूरला येऊन खेळायला आवडते. कारण इथले मैदान खेळपट्टी, ड्रेसिंग रूम, रिकव्हरी रूम आणि इथले जेवण सगळेच एकदम झकास आहे. मला समजले की, मोठ्या संख्येने तिकिटे विकली गेली आहेत. मैदानात सामन्याच्या पहिल्या दिवशी गर्दी करून क्रिकेट रसिक कसोटी सामन्यारे वातावरण गरम करणार आहेत याचा आनंद आहे. एकंदरीत कसोटी साम भारतात प्रेक्षक उत्साहाने हजेरी लावत नाहीत, या विधानाला पूर्णविराम लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT