ind vs aus 1st test Ravindra Jadeja
ind vs aus 1st test Ravindra Jadeja  sakal
क्रीडा

IND vs AUS: विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! ICC ने ठोठावला दंड

Kiran Mahanavar

IND vs AUS 1st Test Ravindra Jadeja : नागपुरात खेळल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजा 5 महिन्यांनंतर परतला आणि त्याने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत (IND vs AUS) 7 विकेट घेतल्यानंतर त्याने 70 धावांची खेळीही खेळली. दरम्यान आयसीसीने जडेजाबाबत कठोर निर्णय घेतला आहे. त्याला एक डी-मेरिट पॉइंट मिळाला असून त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंडही भरावा लागणार आहे. रवींद्र जडेजा याने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.20 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आचरण प्रदर्शित करण्याशी संबंधित आहे.

पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 46व्या षटकात जडेजा त्याच्या बोटावर क्रीम लावताना दिसला. व्हायरल व्हिडीओमध्ये जडेजा सिराजच्या हातावर क्रीम घेत असताना आणि डाव्या बोटावर घासताना दिसत आहे, त्याच हातात बॉल पकडला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि मीडियाने त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. यासाठी मैदानी पंचाची परवानगी आवश्यक असली तरी भारतीय संघाने तसे केले नाही.

भारतीय संघ व्यवस्थापनाने माहिती दिली होती की फिंगर स्पिनर त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या सूजवर क्रीम लावत आहे. मैदानावरील पंचांची परवानगी न घेता हे केले गेले. जडेजाने गुन्हा कबूल केला आणि आयसीसी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेला दंड मान्य केला, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.

जडेजाला ICC आचारसंहितेनुसार लेव्हल 1 च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले. क्रीम केवळ वैद्यकीय हेतूने बोटाला लावले गेले होते त्यामुळे सामनाधिकार्‍यांना समाधान वाटले. बॉलवर क्रीम लावल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. यामुळे चेंडूची स्थिती बदलली नाही. असे झाले असते तर खेळाडू ICC च्या कलम 41.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

MS Dhoni : MS धोनीमुळे हरली CSK? 'या' मोठ्या चुकीमुळे प्लेऑफचे तिकीट गेलं हातातून

Nancy Tyagi: 30 दिवस, 1000 मीटर कापड अन् 20 किलो वजन; कान चित्रपट महोत्सवात परिधान केला स्वत: शिवलेला ड्रेस, नॅन्सी त्यागी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT