IND vs AUS 1st Test esakal
क्रीडा

IND vs AUS 1st Test: रोहितची तळपली बॅट; शतकासह इतिहासही घडवला

भारताचा एकमेव असा कर्णधार आहे ज्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केलं

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज भारत आपला पहिला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा काल दिवस अखेर 56 धावा करून नाबाद होता. मात्र, आज त्याने शतकी खेळी करत नवा इतिहास घडवला आहे.

तो भारताचा एकमेव असा कर्णधार आहे ज्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केलं आहे. अशी कामगिरी विराट किंवा धोनीलाही जमली नव्हती.

रोहित शर्माने त्याचे ४३ वे शतक ठोकले आहे. तर टेस्टमधील ९ वे शतक आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ चेंडूत शतक केलं. यात त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले. रोहित शर्माचं कसोटी कारकिर्दीतलं हे नववं तर घरच्या मैदानावरचं ८वं शतक ठरलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचं हे पहिलंच शतक आहे.

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध शतक केलं आहे. तर टी२० मध्ये त्याने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केले आहे.

कर्णधार म्हणून सर्व फॉरमॅटमध्ये शतक करणारा तो जगातला चौथा फलंदाज बनला आहे. याआधी अशी कामगिरी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिल्शान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT