क्रीडा

IND vs AUS: ईशान-गिलला कॅप्टन रोहितने डावललं! सूर्या अन् भरतचे टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू

Kiran Mahanavar

India vs Australia, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून नागपुरात खेळल्या जात आहे. सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यांना भारताची कसोटी कॅप देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू आज भारताकडून कसोटी पदार्पण करणार आहेत.

सूर्यकुमार यादव हा आधीपासूनच भारतासाठी टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटचा एक भाग आहे, तर यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत पहिल्यांदाच भारताकडून खेळणार आहे. रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवला कसोटी कॅप दिली, तर केएस भरत चेतेश्वर पुजाराने कॅप दिली. शुभमन गिल आणि इशान किशनला पहिल्या कसोटीत संधी मिळाली नाही.

पहिल्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडिया 3 फिरकीपटूंसह उतरणार आहे. नागपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल मानली जाते. अशा स्थितीत चौथ्या डावात फलंदाजी करणे टीम इंडियासाठी सोपे जाणार नाही.

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1000 हजारांहून अधिक धावा केल्या. जगातील इतर कोणताही फलंदाज हा आकडा गाठू शकला नाही. यादरम्यान त्याने 2 शतके झळकावली. अलीकडेच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत ही कामगिरी केली होती. सूर्या 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध आहे. आता त्याला कसोटीत आपली छाप सोडायला आवडेल. अलीकडेच तो रणजी ट्रॉफीमध्ये दिसला आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली होती.

त्याच वेळ यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत 2019 पासून टीम इंडियासोबत आहे, परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. ऋषभ पंत अपघातामुळे मालिकेतून बाहेर आहे. अशा परिस्थितीत भरतला संधी मिळाली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे. रणजीमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिला यष्टीरक्षक फलंदाज आहे. आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या भरतने 2014 मध्ये गोव्याविरुद्ध 311 चेंडूंचा सामना करत 308 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 38 चौकार आणि 6 षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT