ind vs aus 2nd odi yuzvendra chahal 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाच्या या खेळाडूवर अन्याय! रोहितनंतर हार्दिकनेही केले दुर्लक्ष, आता...

Kiran Mahanavar

Ind vs Aus 2nd ODI Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियावर हल्लाबोल करत संघाला 188 धावांत गुंडाळले. यानंतर रवींद्र जडेजा आणि केएल राहुलच्या सर्वोत्तम फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकावे लागले. या सामन्यात एका स्टार खेळाडूला स्थान मिळाले नाही. आधी रोहित आणि आता हार्दिकनेही या खेळाडूला संघात स्थान दिले नाही.

भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या चहलबद्दल बोलले जात आहे. यावर्षी त्याला एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाने जानेवारीपासून आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत परंतु त्याला केवळ 2 सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. यापूर्वी चहलने 24 जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध रोहितच्या नेतृत्वाखाली शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, तर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसावे लागले होते.

चहलने 2016 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते, त्यानंतर टीम इंडियाकडून खेळताना त्याने 72 सामन्यांमध्ये 121 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल 42 धावांत 6 बळी ठरला आहे.

इतकंच नाही तर तो अनेक प्रसंगी संघासाठी मॅचविनर असल्याचे सिद्धही केले आहे, मात्र असे असूनही तो संघातून वगळला जात आहे. टी-20 क्रिकेटमध्येही चहलने खेळलेल्या 75 सामन्यांमध्ये 91 बळी घेतले आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली, शमी-सिराजने सर्वाधिक 3-3 विकेट आपल्या नावावर केल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ 188 धावांवर गारद झाला.

प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या 4 विकेट झटपट पडल्या पण केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने सामना शेवटपर्यंत नेला आणि संघाला 5 विकेटने विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT