IND vs AUS 2nd test Virat Kohli Wicket Controversy  
क्रीडा

Virat Kohli Wicket Controversy: कोहलीची विकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! अंपायरच्या चुकीवरून सर्वत्र संताप

Kiran Mahanavar

IND vs AUS 2nd test Virat Kohli Wicket Controversy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताणा 263 धावा केल्या.

भारताची सुरूवात खराब झाली. पण टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली चांगली फलंदाजी करताणा दिसला. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या धावसंख्येसाठी सज्ज झाला होता, परंतु एका वादग्रस्त एलबीडब्ल्यूमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी 129 चेंडूंत 59 धावांची भागीदारी केली. जडेजा 26 धावांवर आऊट झाला. 135 धावांच्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली. विराट कोहली 84 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. कुहमानने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. अंपायरने कोहलीला आऊट दिला, पण त्याने रिव्ह्यू घेतला. चेंडू एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले. हा निर्णय वादग्रस्त ठरू आहे.

दुसऱ्या दिवशी भारताची सुरूवात खराब झाली, पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लियॉनने दबदबा राहिला. आधी लोकेश राहुल मग 100वा कसोटी सामना खेळणारा चेतेश्वर पुजारा लियॉनच्या गोलंदाजीवर LBW झाला. पुढच्याच षटकात लियॉनने रोहितचा ३२ त्रिफळा उडवला. तो इथेच थांबला नाही आणि त्याने श्रेयस अय्यरलाही आऊट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT