India vs Australia 2nd ODI Match :
India vs Australia 2nd ODI Match : 
क्रीडा

IND vs AUS : सुर्याला वगळणार? मालिका विजेतेपदाची गुढी उभारण्यासाठी भारतीयांसमोर आव्हानांचा डोंगर

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 3rd ODI 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका १-१ बरोबरीत आहे. आज चेन्नईतील अखेरचा सामना जिंकून विजेतेपदाची गुढी भारताला उभारायची असेल, तर 'मिशेल'च्या बाधेतून सुटका कशी करायची हा मोठा प्रश्न सोडवावा लागणार आहे. मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्श भारतीयांसाठी अतिशय अवघड पेपर झाले आहेत.

वानखेडेवरील पहिला सामना भारताने कसाबसा जिंकला, पण अगोदर मिशेल मार्शने आणि त्यानंतर मिशेल स्टार्कने दाणदाण उडवली. केएल राहुल आणि रवींद्र जडेजामुळे निभाव लागला, पण विशाखापट्टणमध्ये भारतीय संघाने सपशेल शरणागती स्वीकारली. मानगुटीवर बसलेल्या या दोन मिशेलवर उतारा सापडत नाही तोवर भारताकडून विजेतेपदाची अपेक्षा फोल ठरणारी असेल, असे सध्या तरी दिसून येत आहे.

मिशेल मार्श आणि मिशेल स्टारविरुद्ध अखखा भारतीय संघ साच सामना गेल्या दोन लढतीत झाला आहे. मार्शन दोन सामन्यांत मिळून १९ पटकार मारले आहेत. मुळात तो प्रथमच सलामीला खेळत आहे आणि त्यात त्याने ही करामत केली आहे. आजचा निर्णायक सामनाही त्याच्यासाठी वेगळा नसले.

मालिका १-१ बरोबरीत असली, तरी आत्मविश्वास ऑस्ट्रेलियाकडे अधिक आहे, कारण भारतीयांना अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. त्यानंतर विजयाचा विचार करावा लागणार आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे सुरुवातीचे सर्व फलंदाज विकेटवर कमी, पण ड्रेसिंग रुममध्येच अधिक वेळ राहत आहेत. हे जेवढा जास्त वेळ खेळपट्टीवर राहतील तेवढ्या जास्त धावा भारताच्या खात्यात जमा होतील.

सूर्यकुमारला वगळणार?

भारताला अनेक प्रश्न सोडवायला लागणार आहेत त्याच सूर्यकुमारचे काय करायचे हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन सामन्यांत पहिल्याच चेंडूवर बाद होणारा सूर्यकुमार माघारी फिरल्यावर भारतीय फलंदाजीची दशा सुरू झालेली आहे, त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याला वगळण्यात आले नाही, तर त्याला खालच्या म्हणजेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले जाऊ शकते. सूर्यकुमारचे संघातले कायम राहिलेच तर त्याच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल.

इनस्विंग यॉर्करवर दैना

मिशेल स्टार्कने भारताच्या या सर्व प्रमुख फलंदाजांचा कच्चा दुवा उघड केला आहे. वेगवान आणि खोलवर टप्पा व इनस्विंग होणाऱ्या चेंडूंनी आपले काम फत्ते केल्यानंतर भारतीयांच्या बॅट मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही सामन्यांसाठीच्या खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त होत्या, परंतु भारतीयांचे कमजोर झालेले पदललित्य त्यांना बाद होण्यास कारणीभूत ठरत आहे.

चेन्नईत काय होणार?

प्रदीर्घ कालावधीनंतर चेन्नईत आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. खेळपट्टी आणि मैदान नव्याने तयार करण्यात आले आहे. मुंबई आणि विशाखापट्टण येथील हवामानाचा फायदा स्टार्कला चेंडू स्विंग करायला झाला होता. त्यामुळे चेन्नईत काय होणार याची उत्सुकता असेल. चिपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकीस अधिक साथ देते. येथे थावाही अधिक होतात, परंतु त्यासाठी या मैदानावर होणाऱ्या आयपीएलसाठी आणि चेन्नई संघात वेगवान गोलंदाज चांगले असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना सहाय्य करेल, अशी खेळपट्टी अगोदरपासूनच तयार करण्यात आली असल्याचे समजते.

गोलंदाजीत बदल अपेक्षित

५०-५० षटकांच्या या मालिकेत पहिले दोन सामने मिळून ४७ घटकेच (३६ आणि ११) गोलंदाजी भारतीयानी केली. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर ताण पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्याचा विचार होणार नाही; मात्र फिरकी गोलंदाज कुलदीप यादवऐवजी शार्दुल ठाकूर किंवा जयदेव उनाडकट असा बदल अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT