IND vs AUS 3rd ODI sakal
क्रीडा

IND vs AUS 3rd ODI: चेन्नईत हरलो तर… केवळ मालिकाच नाही तर सत्ताही धोक्यात!

टीम इंडिया पराभूत झाली तर ऑस्ट्रेलिया...

Kiran Mahanavar

IND vs AUS 3rd ODI : टीम इंडियाने मुंबईत विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममध्ये जोरदार पुनरागमन केले. तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता चेन्नई वनडेत विजेत्याचा निर्णय होईल. बुधवारी तिसरा सामना खेळला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाची बाजी लावणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील विजेता चेन्नईत निश्चित होणार आहे आणि आयसीसीचा नंबर 1 संघ देखील या सामन्याद्वारे निश्चित होईल.

सध्या टीम इंडिया हा वनडेमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ आहे, मात्र जर ते चेन्नईमध्ये पराभूत झाले तर त्यांच्या हातून नंबर 1 ची खुर्ची हिसकावून घेतली जाऊ शकतो. जर टीम इंडिया चेन्नईमध्ये हरली तर ऑस्ट्रेलिया आणि भारताचे 113-113 रेटिंग गुण होतील. पण कांगारू आघाडीवर असतील कारण ते एव्हरेजने गुणांसह टीम इंडियाच्या पुढे असतील. अशा परिस्थितीत भारताला आपला नंबर 1 ताज वाचवायचा असेल, तर चेन्नईमध्ये विजय मिळवणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

तसे, जर टीम इंडिया चेन्नईमध्ये जिंकली तर त्याचा रेटिंग पॉइंट 115 होईल. यासह ती पहिल्या क्रमांकावर राहील परंतु ऑस्ट्रेलियन संघ 2 स्थानांनी खाली घसरून चौथ्या स्थानावर पोहोचेल. या प्रकरणात न्यूझीलंड दुसऱ्या आणि इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

दोन्ही संघ चेन्नई वनडे जिंकण्याचा प्रयत्न करतील हे स्पष्ट आहे कारण मालिकेव्यतिरिक्त रँकिंग देखील धोक्यात आहे. मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी मालिका खूपच रोमांचक बनवली आहे. विशाखापट्टणममध्ये पराभूत झालेली टीम इंडिया चेन्नईमध्ये कशी पुनरागमन करते हे पाहणे बाकी आहे.

चेन्नईच्या खेळपट्टीवर टीम इंडियाला अधिक मदत मिळू शकते कारण तिथे स्पिनर्सचे वर्चस्व असते. त्याच वेळी गेल्या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी होती, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांनी घेतला. त्यात भारतीय फलंदाज मात्र संघर्ष करताना दिसले.

चेन्नईत फिरकीला अनुकूल ट्रॅक असल्यास ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नक्कीच अडचणींचा सामना करावा लागेल. मात्र एक नक्की की शेवटच्या सामन्यातही जगभरातील चाहत्यांना सर्वोत्तम खेळ पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT