ind vs aus-3rd-odi-dog-entry-in-stadium-match-stopped-for-some-time-watch-video india vs australia cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS: चेन्नईच्या स्टेडियममध्ये झाला गोंधळ! तिसरा ODI सामना 10 मिनिट थांबवला

Kiran Mahanavar

IND vs AUS 3rd ODI Dog in Stadium : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळत आहे. या सामन्यादरम्यान अशी विचित्र घटना घडल्याने स्टेडियममध्ये गोंधळ उडाला, त्यामुळे खेळही 10 मिनिट थांबवावा लागला. सामना थांबला तेव्हा सर्व खेळाडू हसताना दिसले.

डावाच्या 43व्या षटकात एक विचित्र घटना घडली. कुलदीप यादवचे हे शेवटचे षटक होते. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शॉन अॅबॉटने चौकार मारला. यानंतर एक कुत्रा स्टेडियममध्ये घुसला, त्यामुळे थोडा वेळ खेळ थांबवावा लागला.

दरम्यान, मैदानाचे कर्मचारी त्या कुत्र्याच्या मागे धावताना दिसले. हे सर्व घडत असताना कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासह अनेक खेळाडू हसताना दिसले.

हा कुत्रा कुठून आला हे कळू शकले नसले तरी स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही हसताना दिसले. एवढेच नाही तर हा कुत्रा बराच वेळ मैदानात फिरत होता. दरम्यान सुरक्षा कर्मचारी त्याच्या मागे धावताना दिसले. कुत्र्याला बाहेर काढेपर्यंत खेळ थांबला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कच्चे तेल महागले अन् सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरात आता सोनं किती रुपयांना विकलं जातंय?

Amravati Social Work : दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रांचे दान नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांची अनोखी माणुसकी

व्हायरल होण्यासाठी काहीही? भारती सिंग सांगितल्या विनोदाच्या मर्यादा, म्हणाली...‘माझी आईसुद्धा पाहणार...’

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

Petrol-Diesel: कच्चे तेल महागल्याने पाकिस्तानात 'लॉकडाऊन'चा विचार! भारतात पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर काय?

SCROLL FOR NEXT