Ind vs Aus 3rd T20 Playing 11 : भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली असून पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
तिसरा सामना मंगळवारी गुवाहाटी येथे होणार आहे. टीम इंडियाची नजर हा सामना जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्यावर असेल. विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. अशा स्थितीत टीम इंडिया आपल्या प्लेइंग-11 मध्ये बदल करते की नाही हे तिसऱ्या सामन्यात पाहायचे आहे.
खरं तर, कोणताही कर्णधार आपल्या विजयी संघात बदल करू इच्छित नाही. पण सूर्यकुमार यादव या सामन्यात बदल करू शकतो. हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो.
अशा परिस्थितीत सूर्यकुमार आपल्या संघात अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय समाविष्ट करू शकतो. संघात सध्या पाच गोलंदाज आहेत. या सामन्यात सूर्यकुमार तिलक वर्माला सोडून शिवम दुबेला संधी देऊ शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्समध्ये प्रसिद्धी मिळवणाऱ्या तिलकने पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी केली नाही.
शिवम हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि अशा स्थितीत टीम इंडियाकडे सहाव्या गोलंदाजीचा पर्याय असेल. टीम इंडियाचा कोणताही गोलंदाज अपयशी ठरला तरी त्याची भरपाई होऊ शकते. शिवमने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जमध्ये हे काम केले आहे.
या मालिकेत भारतीय संघाची फलंदाजी उत्कृष्ट झाली आहे. गेल्या सामन्यात संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली होती. यशस्वी जैस्वालने 53 धावांची तर ऋतुराज गायकवाडने 58 धावांची खेळी खेळली. इशान किशनने 52 धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार आणि ईशानने फलंदाजी केली. रिंकू सिंगने दोन्ही सामन्यात तुफानी फलंदाजी केली. अशा स्थितीत संघाच्या फलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग-11 : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.