ind vs aus 3rd test India bowl Australia out for 197 tourists lead by 88 runs Umesh Yadav and Ravichandran Ashwin India vs Australia Live Score in marathi kgm00
ind vs aus 3rd test India bowl Australia out for 197 tourists lead by 88 runs Umesh Yadav and Ravichandran Ashwin India vs Australia Live Score in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS: 11 धावांत घेतल्या 6 विकेट; अश्विन-उमेशचा दूसऱ्या दिवशी कहर

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळल्या जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 197 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे संघाला 88 धावांची आघाडी मिळाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनने पाच, नॅथन लायनने तीन आणि टॉड मर्फीने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सच्या मोबदल्यात 156 धावा केल्या होत्या.

आज कांगारूंनी चार विकेट्सवर 156 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. त्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब आणि कॅमेरून ग्रीन क्रीजवर आले. यानंतर सुमारे तासभर दोघांनीही एकही विकेट पडू दिली नाही.

मात्र, यानंतर ऑस्ट्रेलियन संघासोबत खेळ झाला. 27 मिनिटांतच भारताने ऑस्ट्रेलियाच्या पुढील सहा विकेट घेतल्या. 71व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अश्विनने पीटर हँड्सकॉम्बच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 77व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 197 धावांवर आटोपला. भारताकडून आर अश्विन आणि उमेश यादव 3-3 विकेट घेतल्या.

उमेश कॅमेरून ग्रीनला एलबीडब्ल्यू तर मिचेल स्टार्क आणि टॉड मर्फी यांना क्लीन बोल्ड केले. त्याचवेळी अश्विनने हँड्सकॉम्ब व्यतिरिक्त अॅलेक्स कॅरीला आणि नॅथन लियॉनला आऊट केले संपूर्ण डाव 197 धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 धावांची आघाडी घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT