ind vs aus 3rd-test-mohammed-siraj-take-only-1-wicket Captain Rohit will not get out team-india cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS: दोन कसोटीत फक्त एक विकेट; तरीही या खेळाडूला कॅप्टन रोहित नाही काढणार बाहेर! काय आहे कारण

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन कसोटी सामने अवघ्या 3 दिवसात संपले. तिसरी कसोटी 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळल्या जाणार आहे. सलग 2 कसोटी सामने जिंकूनही कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेइंग-11 मध्ये बदल करण्यास तयार आहेत. भारतीय फिरकीपटूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पण एका वेगवान गोलंदाजाला आतापर्यंत फक्त एकच विकेट घेता आली आहे.

भारतीय संघाने नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि दिल्लीत झालेल्या कसोटीत 6 गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद सिराजने नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात उस्मान ख्वाजाला बाद केले. दुसऱ्या डावात त्याने एक षटक टाकले. दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सिराजने पहिल्या डावात 10 षटके टाकली. दुसऱ्या डावात त्याला संधी मिळाली नाही. या कसोटीत त्याला एकही विकेट घेता आली नाही.

दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजने आपल्या बाउन्सर चेंडूने कंगारू फलंदाजाचे टेन्शन वाढवले. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाला अनेक चेंडू लागले. वॉर्नर सिराजच्या चेंडूवर जखमी झाल्याने मालिकेतून बाहेर गेला.

मोहम्मद सिराजला 2 कसोटीत एक विकेट मिळाली. पण नव्या चेंडूवर तो उत्कृष्ट लयीत आहे. अशा परिस्थितीत तिसरा कसोटी सामन्यातही खेळताना दिसेल. त्याने आतापर्यंत 17 कसोटीत 47 विकेट घेतल्या आहेत. 73 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT