ind vs aus 3rd-test-rahul-dravid-reached-pitch-with-curator-during-the-lunch-break cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS: लंच ब्रेकमध्ये द्रविडने क्युरेटरलाच घेतले राऊंडात; थेट खेळपट्टीवरच गेला घेऊन

Kiran Mahanavar

IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळल्या जात आहे. दुसरीकडे या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली.

ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक विकेट्स घेतल्या. लंच ब्रेकपर्यंत 7 विकेट गमावलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी क्युरेटरसोबत खेळपट्टीवर गेले आणि त्यादरम्यान तो नाराज दिसला.

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्या डावात 109 धावा करून संपूर्ण भारतीय संघ ऑलआऊट झाला. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज दडपणाखाली दिसले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर डाव सावरला. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेनने अर्धशतकी भागीदारी रचत चहापानापर्यंत संघाला 1 बाद 71 धावांपर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीत अपयशी ठरलेल्या केएल राहुलला तिसऱ्या कसोटीत संधी देण्यात आली नाही. त्याच्या जागी शुभमन गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Shetti : 'माधुरी' हत्तिणीसाठी पेटाच्या अधिकाऱ्यांनी २ कोटींची दिली होती ऑफर.....! राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप

Latest Marathi News Updates Live: समुद्रकिनाऱ्यावर महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवले

वाटोळं होई जाई तुजं वाटोळं... अमृता-अनिताच्या दमदार अभिनयाने सजलेला 'जारण' आता ओटीटीवर; कधी, कुठे पाहाल?

IND vs ENG 5th Test: मी तर त्याला मारला असता! बेन डकेटला बाद करून आकाश दीपने डिवचले, इंग्लंडचे प्रशिक्षक संतापले; अम्पायर...

Crime: ऑनलाइन गेम खेळत होता, नंतर खोलीत जाऊन १२ वर्षीय मुलानं गळफास घेतला, कारण जाणून सर्वांनाच धक्का बसला

SCROLL FOR NEXT