ind vs aus-4th-test-australia-refused-to-play-when-shubman gill-cheteshwar pujara-came-for-bowling cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS: पुजारा अन् शुभमनच्या गोलंदाजीला कर्णधार स्मिथ घाबरला! डाव सोडला अर्ध्यावर?

Kiran Mahanavar

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आणि यासह टीम इंडियाने 2-1 ने बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी घातली. आता 17 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळल्या जाणार आहे.

सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. 76 व्या षटकांपर्यंत कर्णधार रोहित शर्माने आपल्या प्रमुख गोलंदाजांसह गोलंदाजी केली. पण यानंतर त्याने 77व्या षटकात शुभमन गिलला बॉल दिला. रोहित इथेच थांबला नाही. शुभमननंतर त्याने चेतेश्वर पुजारालाही गोलंदाजी दिली.

पुढच्या षटकात शुभमनला पुन्हा गोलंदाजीला आला. या षटकाच्या एका चेंडूनंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मार्नस लॅबुशेन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनीही भारतीय कर्णधार रोहितशी बोलून सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. पुजारा आणि शुभमन गोलंदाजीला आले तेव्हा लबुशेन आणि स्मिथही हसत होते.

पुजारा-गिलची गोलंदाजी पाहून दोघांनीही सामना संपवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी आधीच पात्र ठरला होता. अशा स्थितीत ही कसोटी केवळ औपचारिकता होती. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जूनमध्ये ओव्हल येथे खेळल्या जाणार आहे.

पुजाराने सामन्यात लेगस्पिन गोलंदाजी केली. यापूर्वी त्याने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही एकदा गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात एकही विकेट न घेता दोन धावा दिल्या होत्या. या सामन्यात पुजाराने एका षटकात एक धाव दिली, तर शुभमनने 1.1 षटक टाकून एक धाव दिली. शुभमन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करत होता. मात्र पुजाराने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी अनेकदा गोलंदाजी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT