IND vs AUS 4th Test:  
क्रीडा

IND vs AUS: चौथ्या कसोटीत संघाचे नेतृत्व कोण करणार? कोचने केला खुलासा

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व कोण करणार

Kiran Mahanavar

IND vs AUS 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत आहे, तो म्हणजे भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व कोण करणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स त्याची आई आजारी असल्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियात आहे. अशा स्थितीत चौथ्या कसोटीत त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळू शकतो. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, कमिन्स संपूर्ण संघाच्या संपर्कात आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

सध्या भारतीय संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. यजमान भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिले दोन सामने चमकदार कामगिरी करत जिंकले होते. तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत विजयाचे खाते उघडले. अशा स्थितीत आता चौथ्या कसोटीत संघ चांगली कामगिरी करून मालिका काबीज करेल, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना असेल.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. , सूर्यकुमार यादव , जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुह्नेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Pune Court Verdict : १५ वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा निकाल; आरोपीला जन्मठेप!

१ लाख कर्जाचं ७४ लाख कसे झालं? व्याजाचा आकडा हादरवणार, सावकारानं किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट...

Akola Election : निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नको- मनपा आयुक्त डॉ.लहाने; निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक!

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT