rinku singh 
क्रीडा

Ind vs Aus Rinku Singh: म्हणे क्रिकेटचा मुहम्मद अली! टी-20 करिअरमध्ये रिंकू सिंगने केला 'तो' खराब रेकॉर्ड

Kiran Mahanavar

Ind vs Aus 5th T20i Rinku Singh : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत युवा खेळाडू रिंकू सिंगने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. या मालिकेत फिनिशरची भूमिका साकारताना त्याने शानदार खेळी केली. त्यावेळी माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांत म्हणतो की, रिंकू त्याच्यासाठी मुहम्मद अली आहे.

मात्र मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात रिंकू सिंगसोबत असे काही घडले जे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यापूर्वी कधीही घडले नव्हते.

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचव्या सामन्यात रिंकू सिंग अवघ्या 8 धावांवर बाद झाला. भारतीय संघाच्या डावाच्या 10व्या षटकात तन्वीर संघाच्या चेंडूवर झेलबाद झाला. रिंकू सिंगच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ होती. जेव्हा तो सिंगल डिजिटमध्ये आऊट झाला. यापूर्वी त्याने सर्व सामन्यांमध्ये दुहेरी आकडा गाठला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत रिंकू सिंगने 52.50 च्या सरासरीने 105 धावा केल्या. रिंकूने या मालिकेत काही चांगल्या खेळी खेळल्या, ज्यात तिरुअनंतपुरममधील दुसऱ्या टी-20 सामन्यात नऊ चेंडूत नाबाद 31 धावा केल्या होत्या. ज्याने भारताच्या 44 धावांनी विजयात मोठी भूमिका बजावली होती. त्याचवेळी चौथ्या सामन्यातही त्याने 29 चेंडूत 46 धावांची खेळी करत भारताच्या 20 धावांनी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रिंकू सिंगचा टी-20 तसेच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. रिंकू सिंग भारतीय संघाच्या वनडे संघाचा भाग बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाला पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कपही खेळायचा आहे. अशा परिस्थितीत हा दौरा रिंकू सिंगसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT