ind vs aus odi rishabh pant-starts-recovery-process-with-a-walk-in-the-pool-watch-video  
क्रीडा

Rishabh Pant : पाठीवर जखम अन् ऋषभ पंत स्विमिंग पूलमध्ये...! बरं होण्याच्या दिशेने टाकले पहिलं पाऊल

Kiran Mahanavar

Rishabh Pant News: जर तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर ऋषभ पंतची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

ऋषभ पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो स्विमिंग पूलमध्ये चालताना दिसत आहे. यावरून पंतची रिकव्हरी योग्य दिशेने सुरू असून तो लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंत आगामी आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्याच्या परतीला अजून पाच ते सहा महिने लागू शकतात. पंत त्याच्या चाहत्यांना त्याच्या फिटनेसबाबत सोशल मीडियावर अपडेट देत असतो. व्हिडिओ शेअर करताना पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, "छोट्या गोष्टींसाठी, मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहे."

पंतने नुकतेच दोन पोस्टद्वारे आपल्या मनात काय चालले आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पंतने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बुद्धिबळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्याला बुद्धिबळ खेळायला खूप आवडते. बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरही सर्व काही झटपट बदलण्यात तो पटाईत आहे.

Team India News

यानंतर पंतने त्याच्या दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो टेरेसवर बसला होता. त्याचा एक व्हिडिओ त्याच्या एका मित्राने बनवला होता.

गेल्या वर्षाच्या अखेरीस 30 डिसेंबरला पंत रस्त्यावर अपघातात बळी पडला होता. रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. प्राथमिक उपचारानंतर त्याला मुंबईला हलवण्यात आले आता तो घरी आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT