Ind vs Aus ODI Series Team India Squad  
क्रीडा

IND vs AUS: BCCI ने अचानक बदलला टीम इंडियाचा उपकर्णधार, 'या' खेळाडूला दिली जबाबदारी

Kiran Mahanavar

Ind vs Aus ODI Series Team India Squad : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ​​संघात पुनरागमन केले आहे.

पहिल्या दोन सामन्यात केएल राहुलकडे संघाची कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे, तर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाच्या नवीन उपकर्णधाराचीही घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबरला मोहाली. दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये तर तिसरा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळला जाणार आहे.

एकदिवसीय संघात हार्दिक पंड्याच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे आहे, पण त्यालाही पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मालिकेतील शेवटच्या सामन्यात फक्त हार्दिक पांड्या या जबाबदारीत दिसणार आहे.

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 67 कसोटीत 24.07 च्या सरासरीने 275 विकेट घेतले आहेत आणि 3 शतकांसह 36.41 च्या सरासरीने 2804 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 183 सामने खेळताना 200 विकेट घेत 2585 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये जडेजाने 64 सामने खेळताना 51 विकेट आणि 457 धावा केल्या आहेत.

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ:

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुनील , कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: ''गौतमी पाटीलच्या जीवाला धोका..'' पोलिसांच्या नोटिशीला गौतमीचं उत्तर

Indian Railways Confirm Ticket : रेल्वेकडून प्रवाशांना लवकरच मिळणार Good News! आता ‘कन्फर्म’ तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलता येणार

Latest Marathi News Live Update : बालकांच्या मृत्यूप्रकरणी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री नागपूरमध्ये दाखल

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ पुन्हा वादात अडकला; १८१ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खानच्या भावाला बॅटने मारायला धावला... VIDEO VIRAL

गौतम गंभीरच्या राज्यात 'पराभव' हा पर्यायच असू शकत नाही, Varun Chakravarthy चे टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या शैलीवर मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT