ind vs aus ravindra jadeja should-be-vice-captain-in-third-test-against-australia-harbhajan singh advanced cricket news in marathi sakal
क्रीडा

IND vs AUS: दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा! राहुलच्या जागी हा असेल टीम इंडियाचा उपकर्णधार

तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा उप कर्णधार कोण ?

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 3rd Test : रवींद्र जडेजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार करण्यात यावे असे मत भारताचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी केएल राहुलला उपकर्णधारपदावरून दूर करण्यात आले असून ही जागा रिकामी आहे.

उपकर्णधारपदासाठी जडेजाचे नाव सुचवताना हरभजन सिंग म्हणाला, ‘‘ सध्या सुरु असणाऱ्या बोर्डर-गावसकर करंडकामधील पहिले दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यात उपकर्णधार असलेल्या राहुलला धावा करता आलेल्या नाहीत. त्याउलट मात्र रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना आपली छाप पाडली आहे. तसेच भारतीय संघाला गरज पडली तेव्हा त्याने धावा सुद्धा केल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या वरिष्ठ निवड समितीने आता इंदूर आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी राहुलला उपकर्णधारपदावरून दूर केले आहे. राहुल गेले कित्येक सामने धावा करू शकत नसल्यामुळे तो राष्ट्रीय संघामध्ये असेलच असे नाही. त्यामुळे जो खेळाडू अंतिम ११ जणांमध्ये निश्चित असेल, त्यालाच संघाचे उपकर्णधार करण्यात यावे.

रवींद्र जडेजा सध्या अष्टपैलू कामगिरी करत आहे. जडेजा एक अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याला कठीण परिस्थितीत कसा खेळ करायचा हे चांगले माहिती आहे. इतकेच नव्हे तर त्याला भारतीय कसोटी संघाबरोबरच आणि एकदिवसीय संघाचे सुद्धा उपकर्णधार करण्यात यावे असे सुद्धा हरभजन पुढे म्हणतो.

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जडेजा जवळपास पाच महिने क्रिकेटपासून दूर होता. मागच्या वर्षी झालेल्या आशियाई क्रिकेट करंडकादरम्यान जडेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सुद्धा खेळू शकला नव्हता. मात्र त्याने क्रिकेट खेळायची कोणत्याच प्रकारे घाई केली नाही आणि रणजी स्पर्धेमध्ये सौराष्ट्राच्या संघाकडून मैदानावर पुनरागमन केले.

सध्या सुरू असणाऱ्या बोर्डर- गावसकर करंडकामध्ये जडेजाने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे १७ फलंदाज बाद केले आहेत. तर संघाला गरज असताना त्याने चांगली खेळी करत ९६ धावा सुद्ध केल्या आहेत . तिसरा सामना इंदूरमध्ये १ मार्चपासून खेळविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT