Shubman Gill India vs Australia Test 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियासाठी शुभमन गिल ठरला शुभ! कांगारू संघाला दिवसा दाखवले तारे अन् ठोकले दुसरे शतक

Kiran Mahanavar

Shubman Gill India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सलामीवीर शुभमन गिलने शतक झळकावले. गिलचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. इतकेच नाही तर अहमदाबादच्या या मैदानावर त्याने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले होते.

गिलने 61व्या षटकात नॅथन लियॉनच्या डोक्यावर चौकार मारून 96 धावांपर्यंत मजल मारली. गिलनेही चौकार मारून शतक पूर्ण केले. 62व्या षटकात मर्फीच्या दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट फाईनवर त्याने दमदार शॉट खेळला. यासह त्याने 194 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान गिलने 10 चौकार आणि 1 षटकार मारला.

एकाच वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, सुरेश रैना आणि केएल राहुल यांनी ही कामगिरी केली आहे.

शुभमन गिलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. या खेळाडूने तीन महिन्यांत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. गिलने न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावून अनेक मोठे विक्रम मोडीत काढले होते.

आता शुभमनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही रिमांडवर घेतले असून कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे. या युवा खेळाडूसमोर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनपासून मिचेल स्टार्कपर्यंतच्या सर्व शक्ती अपयशी ठरल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा लेक गाजवतोय मैदान; BCCI च्या वनडे स्पर्धेसाठी झाली संघात निवड

SCROLL FOR NEXT