ind vs aus test 
क्रीडा

IND vs AUS: नागपूर कसोटी हरल्यानंतर कांगारूने स्पिनर बदलला! संघात केला मोठा बदल

पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात खळबळ!

Kiran Mahanavar

Ind vs Aus Test : नागपूर कसोटीतील दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघात बदल करण्यात आला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनमनचा दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात समावेश करण्यात आला आहे. मिचेल स्वीपसनच्या जागी 26 वर्षीय कुहनमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. स्वीपसन त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी घरी परतला आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी तो पुनरागमन करेल. तिसरी कसोटी धरमशाला येथे होणार असून हा सामना येथे होणार की नाही याबाबत साशंकता आहे.

नागपूर कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 177 आणि दुसऱ्या डावात 92 धावांत आटोपला. फिरकीच्या साहाय्यक खेळपट्टीवर रवींद्र जडेजाने पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने 5-5 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियासाठी फिरकीपटू टॉड मर्फीने पदार्पणात चमकदार कामगिरी करत 7 विकेट घेतल्या.

मॅथ्यू कुहनमनला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन संघाला रवींद्र जडेजासारख्या गोलंदाजाची गरज आहे. अॅश्टन अगर हा देखील संघात डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, त्याला नागपूर कसोटीत संधी मिळाली नाही. कुहनमनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 सामन्यांत 34.80 च्या वेगाने 35 विकेट घेतल्या आहेत. स्वीपसन उपलब्ध असताना त्याला क्वीन्सलँडकडून खेळायला अनेकदा मिळाले नाही. मात्र संधी मिळताच त्यांनी त्याचे सोने केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला.

ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स, अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कुहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ. स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

SCROLL FOR NEXT