ind vs aus test India announced squad for third and fourth Test against Australia kl rahul drop maybe sarfaraz khan-mayank agarwal chance cricket news kgm00
ind vs aus test India announced squad for third and fourth Test against Australia kl rahul drop maybe sarfaraz khan-mayank agarwal chance cricket news kgm00 sakal
क्रीडा

IND vs AUS: केएल राहुलबाबत BCCIचा मोठा निर्णय! शेवटच्या दोन कसोटींसाठी संघाची घोषणा लवकरच

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. याआधी पहिल्या दोन कसोटींसाठी संघाची निवड करण्यात आली होती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने नागपूर आणि दिल्ली कसोटीत चांगली कामगिरी केली.

मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर शिवसुंदर दास यांनी काही दिवसांसाठी निवड समितीची जबाबदारी स्वीकारली आहे. कसोटीशिवाय तीन एकदिवसीय मालिकेसाठीही संघ जाहीर केला जाऊ शकतो.

रणजी ट्रॉफीचा चालू हंगामही रविवारी संपला आहे. जेथे सौराष्ट्रने अंतिम फेरीत बंगालचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. संघ निवडीत रणजीतल्या खेळाडूचाही विचार केला जाणार आहे. पहिल्या दोन कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुलला वगळले जाऊ शकते. त्याचवेळी रणजी फायनलमध्ये नऊ विकेट घेणारा जयदेव उनाडकट पुनरागमन करू शकतो. रणजी फायनलमध्ये खेळण्यासाठी पहिल्या कसोटीनंतर त्याला वगळण्यात आले.

खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला टीम इंडियामधून वगळले जाऊ शकते. मयंक अग्रवालची उर्वरित दोन कसोटींसाठी तिसरा सलामीवीर म्हणून निवड केली जाऊ शकते. या रणजी मोसमात मयंकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने नऊ सामन्यांच्या 13 डावात 990 धावा केल्या. यादरम्यान तीन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. मयंकने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.

रणजी ट्रॉफीतील कामगिरी लक्षात घेतली तर मुंबईचा फलंदाज सर्फराज खान पण आहे. सरफराजने या मोसमात सहा सामन्यांच्या नऊ डावांत 556 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. सरफराजने रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. त्यानंतर त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT