ind vs aus test josh hazlewood and david warner ruled out of Test series Two big shocks to Australia cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघाचा दुष्काळात तेरावा! दोन दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

ऑस्ट्रेलियन संघाला बसले दोन मोठे धक्के!

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात दोन्ही कसोटी यजमानांनी आपल्या नावावर केली आहे.

त्याचवेळी मालिकेतील तिसर्‍या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे दोघेही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही खेळाडू कर्णधार पॅट कमिन्ससोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

भारताविरुद्ध सलग दोन कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. त्याचवेळी दिल्ली कसोटीनंतर कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. कमिन्स इंदूर कसोटी अर्थात तिसर्‍या सामन्यापूर्वी भारतात परतणार आहे.

पण डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेजलवुड दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. वॉर्नर दुसऱ्या कसोटीसाठी संघाचा होता, त्यावेळीस पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याच्या डोक्याला आणि कोपराला मार लागला होता.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी बाहेर गेला आहे. त्याचवेळी वॉर्नरही त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाला परत जाऊ शकतो. या मालिकेत जोश हेजलवुडने एकही सामना खेळला नाही. मालिकेपूर्वीच तो जखमी झाला होता. त्याचवेळी वॉर्नर दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी गमावली आणि दुसरी कसोटी 6 विकेटने गमावली. यासोबतच संघातील स्टार खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघालाही मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघाला मालिका वाचवण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी जिंकाव्या लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

Rahul Gandhi: ‘राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या’; राहुल गांधींचे महारॅलीसाठी देशवासीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT