ind vs aus test match gautam gambhir-statement-on rohit sharma and team india-rahul dravid-vvs-laxman-like-innings cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS: वर्चस्व असले तरी गाफील राहू नका! दिग्गज खेळाडूने रोहितच्या सेनेला दिला इशारा

पहिले दोन कसोटी सामने तीन दिवसांत जिंकून भारताने निर्विवाद वर्चस्व मिळवलेले असले तरी...

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Aus Test Match : ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने तीन दिवसांत जिंकून भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व मिळवलेले असले, तरी माजी सलामीवीर आणि समालोचक गौतम गंभीर याने टीम इंडियाला गाफिल न राहण्याचा सल्ला दिला आणि याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कोलकता कसोटीत व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या विक्रमी भागीदारीने कसा उलटवार केला होता, याचे उदाहरणही दिले.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून बॉर्डर-गावसकर करंडक आपल्याकडेच राखला असला, तरी मालिका अजून जिंकलेली नाही. तसेच आणखी एक सामना जिंकून कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्याचेही उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी गौतम गंभीरने भारतीय संघाला सावधगिरीचा इशारा दिला.

2001-2002च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. मुंबईत झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला धुव्वा उडवला होता. त्यानंतर कोलकता कसोटीत भारताला पहिल्या डावात फॉलोऑनही दिला; पण दुसऱ्या डावात लक्ष्मण (281) आणि राहुल द्रविड (180) यांनी 376 धावांची विक्रमी भागीदारी करून ऑस्ट्रेलियावर डाव उलटवला होता. कोलकत्तानंतर चेन्नईत झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका 2-1 अशी जिंकली होती. गंभीरने रोहित शर्माच्या भारतीय संघाने आता 2-0 आघाडी घेतलेली असली, तरीही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

आत्ताची ही मालिका भारत 4-0 अशी जिंकेल, असे भाकित मी करणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया संघात स्टीव स्मिथ, मार्नस लाबूशेन आणि उस्मान ख्वाजा सारखे फिरकीचा सामना करू शकणारे फलंदाज आहेत. यापैकी एकाने जरी मोठी शतकी खेळी केली, तरी ऑस्ट्रेलिया उलटवार करू शकेल, असे गंभीरने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

MI च्या इतिहासातील एक पर्व संपलं! १६ वर्षांपासून संघासोबत असलेल्या दिग्गजाने, MI ला ठोकला रामराम

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT