ind vs aus test matthew-hayden-decodes-virat-kohli-struggles-in-test-cricket-it-got-nothing-to-do-with-technique cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS : इंदूर कसोटीतील पराभवानंतर दिग्गज खेळाडूने विराटवर केले धक्कादायक विधान!

नागपूर आणि दिल्लीनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळलेला हा सामना अवघ्या अडीच दिवसांत संपला अन्...

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd Test : बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 गडी राखून पराभव केला. नागपूर आणि दिल्लीनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळलेला हा सामना अवघ्या अडीच दिवसांत संपला.

पहिल्या डावात संपूर्ण संघ 109 धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला केवळ 163 धावा करता आल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 76 धावांचे लक्ष्य ठेवले, जे कांगारू संघाने एक विकेट गमावून पूर्ण केले. विराट कोहलीसह भारतीय संघातील स्टार फलंदाजही काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूने विराट कोहलीवर मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने विराट कोहलीवर वक्तव्य केले. विराट कोहलीच्या खेळीत काहीही चुकीचे नसल्याचे माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने म्हटले आहे. हेडनने स्टार स्पोर्ट्सशी बोलताणा म्हणाला की, खेळाडू अशा टप्प्यातून जातात जेथे ते धावा करू शकत नाहीत, परंतु अधिक काळ क्रीजवर कसे राहायचे, फलंदाजाने त्यावर काम करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या करण्यासाठी धडपडत आहे. विराट कोहलीला त्याच्या शेवटच्या 15 कसोटी डावांमध्ये 50 धावाही पार करता आलेल्या नाहीत. सध्याच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कोहलीला 5 डावात केवळ 111 धावा करता आल्या आहेत.

पुढे बोलताना हेडन म्हणाला की, विराटने काय साध्य केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्याकडे खूप चांगली ऊर्जा आहे, त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून काहीही चुकीचे नाही असे दिसते. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर पोहोचता, जिथे विराटने यश मिळवले आहे, तेव्हा कधी-कधी फोकसची समस्या निर्माण होते.

हेडनने असेही म्हटले की, एकाग्रता हा घटक त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात फलंदाजांसाठी एक मुद्दा बनतो आणि हे कोहलीच्या बाबतीतही असू शकते. अनेक प्रश्न आहेत पण विराटला स्वतःला या वाईट टप्प्यातून मार्ग काढावा लागेल. खेळाडू वाईट काळातून जातात.

तिसर्‍या कसोटीत भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवल्याने ऑस्ट्रेलियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र झाला. अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीतील विजयामुळे भारताचे WTC फायनलमधील स्थान निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT