IND vs AUS test Mohammad Shami 
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमीचे तुफान! कोहली-द्रविड ही पडले फिके

Kiran Mahanavar

IND vs AUS test Mohammad Shami : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीने 37 धावांची तुफान खेळी केली. या खेळीत त्याने तीन गगनचुंबी षटकार ठोकले. आपल्या जलद खेळीमुळे मोहम्मद शमीने कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत राहुल द्रविडला आणि विराट कोहली मागे टाकले आहे. या बाबतीत तो कसोटी क्रिकेटमध्ये अनेक भारतीय दिग्गज फलंदाजांपेक्षा पुढे आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या राहुल द्रविडच्या नावावर केवळ 21 षटकार आहेत. भारताचा दिग्गज विराट कोहलीने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 104 सामने खेळले असून त्यात त्याने केवळ 24 षटकार मारले आहेत. पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 61 सामने खेळले आहेत ज्यात 722 धावा केल्या आणि 25 षटकार मारले आहेत. नागपूर कसोटीपूर्वी शमीच्या नावावर केवळ 22 षटकार होते. त्याने यापूर्वीच चेतेश्वर पुजारा, मोहम्मद अझरुद्दीन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गजांना मागे टाकले होते.

चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजारांहून अधिक धावा केल्या पण यादरम्यान त्याने केवळ 15 षटकार मारले. मोहम्मद अझरुद्दीननेही आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजारांहून अधिक धावा केल्या मात्र त्याला केवळ 19 षटकार ठोकता आले. व्हीव्हीएस लक्ष्मण या बाबतीत खूप मागे आहे. 8 हजारांहून अधिक कसोटी धावा करणाऱ्या लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ 5 षटकार मारले.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या स्फोटक फलंदाजाने 104 कसोटी सामन्यांच्या 180 डावांमध्ये 91 षटकार मारले आहेत. एमएस धोनी येथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 78 षटकार ठोकले. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टरने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 69 षटकार ठोकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT