India vs Australia Test Series SAKAL
क्रीडा

IND vs AUS: भारतात खेळण्याचे स्वप्न अधुरे? 'या' ऑस्ट्रेलियन फलंदाजाला नाही मिळाला व्हिसा

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी कांगारूंचा संघ भारतात दाखल झाला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ भारतीय भूमीवर चार कसोटी सामने खेळणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीची पहिली कसोटी 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियन संघ जवळपास एक आठवडा आधीच भारतात पोहोचला आहे. मात्र संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा सध्या भारतात आलेला नाही. उस्मान ख्वाजाला व्हिसा मिळू शकला नाही. यामुळे तो संघासोबत भारतात आलेला नाही.

उस्मान ख्वाजा अजूनही ऑस्ट्रेलियातच आहे. तथापि मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आशा आहे की उस्मान ख्वाजाचा व्हिसा मंजूर होईल आणि तो गुरुवारी 2 फेब्रुवारी 2023 ला भारतात जाईल. उस्मान ख्वाजाला भारताचा व्हिसा मिळाला नाही, तर भारतात कसोटी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहू शकते. उस्मान ख्वाजाने आतापर्यंत भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

सोशल मीडियावर एक मीम पोस्ट करत ख्वाजाने लिहिले की, "मी माझ्या भारतीय व्हिसाची वाट पाहत आहे." पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ख्वाजाने ऑस्ट्रेलियासाठी 56 कसोटी, 40 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 36 वर्षीय फलंदाजाने 2016 मध्ये आयपीएलमध्ये भाग घेतला होता. ख्वाजा यांना सोमवारी ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार अनुभवी फिरकीपटू शेन वॉर्नच्या नावावर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

  • पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर

  • दुसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली

  • तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला

  • चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Disruption : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-ठाणे लोकल रेल्वेसेवा खोळंबली, प्रवाशांचे प्रचंड हाल

Kolhapur Crime News : डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांना चावून बोटचं तोडलं, छातीवर लाथ मारली अन्; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

आनंदाची बातमी ! धावत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, हेल्पलाइनवरून परत मिळवा; साखळी खेचल्यास हाेणार दंड; मदतासाठी काय करावा लागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT