india vs australia sakal
क्रीडा

Ind Vs Aus: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी BCCIचा मोठा निर्णय! 4 दिग्गज खेळाडूचा संघात समावेश

Kiran Mahanavar

India vs Australia : 2023च्या सुरुवात टीम इंडियासाठी एकदम फर्स्ट क्लास झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेला त्यानंतर न्यूझीलंडला टी-20 आणि एकदिवसीय मध्ये धूळ चारली, आता टीम इंडियाची नजर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली सराव सुरू केला असून संघातील सर्व खेळाडूंना घाम फुटला आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने मोठा निर्णय घेतला असून संघात चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर आणि राहुल चहर यांना टीम इंडियाशी जोडले आहे. या सर्वांना नेट गोलंदाज म्हणून संघात ठेवण्यात आले आहे, जे संपूर्ण मालिकेसाठी टीम इंडियासोबत राहतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी मालिका होणार आहे, ज्यामध्ये फिरकीपटूंचे वर्चस्व असणार आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाने भारतीय फिरकीपटूंना टक्कर देण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे टीम इंडियानेही तयारी सुरू केली आहे.

टीम इंडियाचे हे खेळाडू फक्त फिरकीपटू म्हणून जोडले गेले आहेत. तर भारताकडे जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव असे चार वेगवान गोलंदाज आहेत, जे सराव आणि सामन्यात उपयुक्त ठरू शकतात. फिरकीपटू म्हणून संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही समावेश आहे. म्हणजेच सरावादरम्यान आता भारताकडे एकूण 8 फिरकीपटू असणार आहेत, अशा स्थितीत फलंदाजांना तयारीसाठी भरपूर संधी असेल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक :

  • पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर

  • दुसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली

  • तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला

  • चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT