IND vs AUS Jasprit Bumrah sakal
क्रीडा

IND vs AUS: जसप्रीत बुमराह बाबत मोठे अपडेट! ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळणार

Kiran Mahanavar

IND vs AUS Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात बॉर्डर गावसकर करंडक 4 कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय संघाचा भाग असू शकतो.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह दुखापतीमुळे न्यूझीलंड मालिकेतही संघाचा भाग नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तो आता पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या एका बातमीनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवल्या जाणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आम्हाला आशा आहे. पण त्याच्या प्रगतीवर ते अवलंबून असेल.

जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहच्या कंबरेला 'स्ट्रेस फ्रॅक्चर' झाला होता. या दुखापतीमुळे गतवर्षी आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतुन तो बाहेर गेला. जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत 30 कसोटी सामने, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 128, एकदिवसीय सामन्यात 121 आणि T20 मध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Bhau Flex Kadha Campaign : महायुती सरकारला ‘महाराष्ट्र विद्रूपीकरण पुरस्कार’ द्या; काँग्रेसने महायुती सरकारला केले लक्ष्य

SCROLL FOR NEXT