virat kohli anushka sharma in rishikesh before test series australia sakal
क्रीडा

Virat Kohli: कसोटी मालिकेपूर्वी विराट-अनुष्काची पुन्हा आध्यात्मिक यात्रा; थेट पोहोचले मोदींच्या गुरू चरणी

या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली वृंदावनला गेला होता आता...

Kiran Mahanavar

Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली सध्या टीम इंडियातून ब्रेकवर आहे. आपल्या मोकळ्या वेळेत माजी कर्णधार पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघाला आहे. विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेशला पोहोचला आहे, जिथे त्यांनी स्वामी दयानंद जी महाराजांच्या आश्रमाला भेट दिली. स्वामी दयानंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरू होते. सध्या सोशल मीडियावर विराट आणि त्याच्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली वृंदावनला गेला होता, जिथे त्याने पत्नी आणि मुलीसह बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली. ब्रेकमधून आल्यानंतर विराट 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका वनडे मालिकेत त्याच्या बॅटचा जोरदार चालली.(virat kohli anushka sharma in rishikesh before test series australia)

भारत न्यूझीलंड वनडे मालिकेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दोन्ही देशांमधील टी-20 मालिकेतून ब्रेक देण्यात आला होता. त्याचे पुढील लक्ष्य 9 फेब्रुवारीपासून सुरू होणारी भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका आहे. ही मालिका मोठ्या फरकाने जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.

या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी विराट कोहली पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघाल्याचे मानले जात आहे. श्रीलंका-न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट जोरदार बोलेल, अशी त्याला आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT