Virat Kohli sakal
क्रीडा

Virat Kohli: चौकार मारत विराटचा मोठा करिष्मा! असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू

Kiran Mahanavar

Ind vs Aus Test Virat Kohli : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामना खेळल्या जात आहे. दिल्ली कसोटीत विराट कोहलीने अद्भुत कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज देखील त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा विक्रम करू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट 25,000 धावा करणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण करणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही मोठी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच वेळी 50+ ची सरासरी आणि सर्वात जलद 25000 धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

  • सचिन तेंडुलकर (भारत) - 34357 धावा

  • कुमार संगकारा (श्रीलंका) - 28016 धावा

  • रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा

  • महेला जयवर्धने (श्रीलंका)- 25957 धावा

  • जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा

  • विराट कोहली (भारत) - 25000+ धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25000 धावा

विराट कोहलीने केवळ 549 सामन्यांमध्ये 25000 धावांचा टप्पा पार केला आहे. याआधी कोणत्याही फलंदाजाने इतक्या डावात 25 हजार धावा केल्या नाही. त्याच्याशिवाय सचिन तेंडुलकरने 577 डावांमध्ये 25000 धावा केल्या. त्याचबरोबर रिकी पाँटिंगने 588 डावात, जॅक कॅलिसने 594 डावात, कुमार संगकारा 608 आणि महेला जयवर्धने 701 डावात हा आकडा पार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT